Breaking News

रोहित, अजिंक्यला ‘अर्जुन’ पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, दि. 17 -  आघाडीचे क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांना येथील एका सोहळ्यात क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अजिंक्य रहाणेला यंदाचा तर रोहित शर्माला गेल्या वर्षीचा पुरस्कार आज प्रदान केला गेला. हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतो. परंतु, 28 ऑगस्टला झालेल्या पुरस्कार समारंभात हे दोघे उपस्थित राहू शकले न्वहते. त्यामुळे त्यांना आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.