Breaking News

शेअर बाजाराच्या निर्देशांकात 40 अंकांची वाढ

मुंबई, दि. 16 -  मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 40.66 अंकांची वाढ होऊन बाजार 28,412 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 15.95 अंकांची वाढ होऊन बाजार 8,742.55 वर बंद झाला. जागतिक स्तरावरील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर दिसून आला. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 28,398.33 वर उघडला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 8,743.85 वर उघडला. दिवसभरात बँक, वाहन, माहिती-तंत्रज्ञान, धातू, बांधकाम क्षेत्रातील समभागांमध्ये घसरण दिसून आली.