ऑल इंडिया रेडिओ’कडून बलुच प्रसारण सेवा लॉन्च
नवी दिल्ली, दि. 17 - जगभरातील बलुच लोकांना जोडण्यासाठी ‘ऑल इंडिया रेडिओ’कडून बलुच प्रसारण सेवेचे मल्टी मिडिया संकेतस्थळ व मोबाईल प शुक्रवारी लॉन्च केले. प्रसार भारतीचे अध्यक्ष ए. सूर्यप्रकाश यांनी एका कार्यक्रमात हे लॉन्च केले. ऑल इंडिया रेडिओचे महासंचालक शहरयार यांनी सांगितले की, सरकारने बलुच रेडिओ सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र आकाशवाणीकडून 42 वर्षांपासून परराष्ट्र प्रसारण सेवेंतर्गत बलुच समाचारचे प्रसारण केले जात आहे. एक तासाच्या या प्रसारणात बातम्यांशिवाय बलुच लोकसंगीत व लोक कथाही प्रसारित केल्या जातात. मल्टी मिडिया संकेतस्थळ व मोबाईल प सुरू झाल्याने अमेरिकेसह जगभरातील बलुच लोक या प्रसारण सेवेचा लाभ घेऊ शकतात, असेही शहरयार यांनी सांगितले.