गांधी जयंतीला सांगलीत स्वच्छता मोहिमेत एक लाखावर विद्यार्थी, संस्था, संघटना, कार्यकर्ते मंडळांचा पुढाकार
सांगली, दि. 30 - येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीदिनी महापालिका क्षेत्रात सुमारे एक लाख लोक रस्त्यावर येत शहरभर स्वच्छता करणार आहे. आयुक्त रवींद्र खेबुडकर, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध शासकीय विभागप्रमुखांच्या उपस्थितीत बैठक झाली.
श्री. खेबुडकर यांनी सांगितले की, महापालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शासकीय कर्मचारी स्वयंसेवी संस्था, संघटना, गणेश मंडळे, कार्यकर्ते एकत्र येऊन ही मोहीम राबवतील कचरा गोळा करुन तो एकत्रित केला जाईल. महापालिकेची संपूर्ण यंत्रणा तो संकलित करेल. एकाच दिवशी हजारो टन कचरा गोळा करुन शहर स्वच्छ करण्याचा संकल्प आहे. दोन दिवसांत या मोहिमेचे युध्दपातळीवर नियोजन आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.