Breaking News

सिंधू करारावरुन घाबरलेल्या पाकची वर्ल्ड बँकेकडे धाव

इस्लामाबाद, दि. 28 - भारताकडून 56 वर्षापूर्वीचा करार रद्द करण्याच्या हलचालींमुळे घाबरलेल्या पाकिस्तानने आता वर्ल्ड बँकेकडे धाव घेतली आहे. पाकच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी वर्ल्ड बँकेकडे धाव घेऊन मदतीची याचना केली आहे. पाकिस्तानचे अ‍ॅटर्नी जनरल अश्तर औसाफ अली यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या एका शिष्टमंडळाने वॉशिंग्टन डीसीमधील वर्ल्ड बँकेच्या मुखालयात बँकेच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन 1960 मधील सिंधू करारसंदर्भात मध्यस्थी करण्याची मागणी केली.
याशिवाय पाकिस्तानमधील जिओ न्यूज या न्यूज चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडेही याप्रकरणी धाव घेतली आहे. मात्र, याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली नाही. पाकिस्तानने 19 ऑगस्ट रोजी भारताकडे औपचारीक रुपात नीलम आणि चिनाब नदीवरील वीजनिर्मितीसंदर्भातील वादावर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी केली होती. सध्या हे प्रकरण पाणीवाटप लवादाकडे आहे.