Breaking News

पाकिस्तानमधील ’सार्क’ परिषदेवर भारताचा बहिष्कार

नवी दिल्ली, दि. 28 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानबाबत आणखी एक कठोर भूमिका घेतली आहे. इस्लामाबादमध्ये आयोजित सार्क परिषदेला भारत हजेरी लावणार नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.
येत्या नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये सार्क देशांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. मात्र भारताने या परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. उरी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर कठोर पावले उचलल्याचे पाहायला मिळत आहे.
एका देशाने परिषदेसाठी प्रतिकूल वातावरण निर्माण केले आहे, असे भारतातर्फे सार्कच्या अध्यक्षांना सांगण्यात आले आहे. भारतासोबतच अफगाणिस्तान, बांगलादेश आणि भूतान हे देशही सार्क परिषदेला गैरहजेरी लावण्याची शक्यता आहे.