Breaking News

जगातील सर्वात मोठी टेलिस्कोप चीनमध्ये कार्यरत

बिजिंग, दि. 28 - जगातील सर्वात मोठी रेडिओ टेलिस्कोप चीनमध्ये रविवारपासून कार्यरत झाली आहे. चीनच्या नैऋत्येकडील गुईझोऊमध्ये या टेलिस्कोपची बांधणी करण्यात आली आहे.
या टेलिस्कोपच्या माध्यमातून अवकाश आणि इतर ग्रहांवर लक्ष ठेवले जाणार आहे. या टेलिस्कोपच्या बांधणीसाठी 1.2 अब्ज युआन खर्च करण्यात आले आहेत. या टेलिस्कोपचा आकार फुटबॉलच्या 30 मैदानांएवढा आहे. 2011मध्ये या टेलिस्कोपचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. याच्या बांधणासाठी 10 हजार लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. तसेच स्थलांतरीतांसाठी चीनने 270 दशलक्ष डॉलर खर्च केले आहेत.