Breaking News

पेट्रोल 58 पैशांनी महाग तर डिझेल 31 पैशांनी स्वस्त

मुंबई, दि. 16 -  आज मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या किंमतीत प्रती लीटर 58 पैश्यांनी वाढ झाली आहे. तर डिझेल प्रतीलीटर 31 पैश्यांनी स्वस्त झालं आहे. दर महिन्यांच्या 1 आणि 15 तारखेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्चा तेलाचा आढावा घेतला जातो. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची नव्याने रचना करण्यात येते.
1 आणि 16 तारखेला इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आपल्या दरात बदल करतात.