जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट धुँवाधार पावसामुळे पिके कोलंडली
परभणी/प्रतिनिधी, दि. 30 - खरिप हंगामाच्या सुुगी बहरात आली असतांनाच जिल्ह्यात पावसाने धुँवाधारपणे बरसत नुकसानजनक थयथयाट करणे सुरु केले आहे. गेल्या पंधरा दिवसामध्ये विक्रमी पावसाची नोंद जिल्ह्यात झाली असतांना देखील दि. 29 सप्टेंबर 2016 रोजी पुन्हा पावसाचे आगमन चिंताजनक बाब असल्याचे मत शेतकर्यांतुन व्यक्त करण्यात आले आहे.
परभणी जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने ठियामांडून थयथयाट करणे सुरु केले आहे. अपेक्षीत पावसाची गरज पूर्ण होताच शेतकर्यांनी ओल्या दुष्काळाची चाहुल असल्याचे संकेत दिले. परंतु प्रशासनाच्या वतीने काही ठिकाणच्या पिकांची पाहणी चालु असतांनाच पावसाने पुन्हा कहर करत दि. 29 रोजी सोसाट्याच्या वार्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अगोदरच गेल्या पंधरा दिवसापासुन सुरु असलेल्या पावसाने दोन दिवस विश्रांती घेतली. त्यामुळे वातावरण कापणी योग्य वातावरण झाल्याचे दिसतांच जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनी कापणीस आलेल्या सोयाबीनच्या पिकात विळा चालवला आणि एका दिवसात पिकाची कापणी केली. परंतु 29 सप्टेंबरच्या दुपारच्या प्रहारानंतर पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केल्याने शेतकर्यांच्या चिंतेत वाढ होण्यास सुरुवात झाली. पावसाचे सततचे बरसने धोकादायक असुन जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट घिरट्या घालत असल्याची चिंतातुर प्रतिक्रिया शेतकरी वर्गातुन करण्यात येत आहे. कापसाच्या पिकाला पाणी सहन होत नसल्याने अनेक शेतांमधील कापसाचे पिक जागच्या जागीच उंबळून येत आहे. तुरीचे पिक पिवळे पडले आहे. तर सोयाबीन काढणीस येवूनही पावसामुळे ते काढणे शक्य होत नसल्यानेे शेतकरी पुर्णपणे हतबल झाला आहे.