आत्मा योजनेअंतर्गत शेतकर्यांना मार्गदर्शन
पाथरी/प्रतिनिधी, दि. 30 - आत्मा योजने अंतर्गत परमपरांगत कृषी विकास योजने मधील सेंद्रीय शेती गटाचे प्रशिक्षण कार्यक्रम पंचायत समिती पाथरी येथे आयोजन केले होते. यात पाथरी व मानवत तालुक्यातील सेंद्रीय गटातील सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष एम.एल चपळे (प्रकलप संचालक आत्मा), संतोष नादरे (तालुका कृषी अधिकारी पाथरी व मानवत), हर्षवर्धन खेडकर (मंडळ कृषी अधिकारी पाथरी), प्रमुख मार्गदर्शक सदाशिव थोरात साहेब ( अध्यक्ष-जन्म भुमी फाऊंडेशन पाथरी), शुभम टाक ( समुह गट मार्गदर्शक) याची प्रमुख उपस्थिती होती. या प्रशिक्षणास थोरात सरांनी सेंद्रीय शेती काळाची गरज आहे. रासायनीक किडक नाशके व खताचे मानवी जिवनावर होणारे व भविष्यात उदभवणारे दुष्परिणाम व शारीरीक रोगा विषयी महत्वाचे सांगीतले. तसेच शेतकर्यांना बिज अमृतम जिव अमृत व दशपर्णी अर्क, निबोळी, अर्क, हे कसे तयार करायचे व ते वापरल्याने होणारे फायदे या विषयी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. तसेच सेंद्रीय गित सादर करुन या गितामधुन सेंद्रीय शेती विषयची महतव शेतकर्यांना पटवून दिले.