भारत-पाकिस्तानने एकमेकांविरूद्ध युद्ध पुकारू नये : आफ्रिदी
मुंबई, दि. 30 - भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशात तणावाचे वातावरण आहे. सैन्याच्या कारवाईवर देशभरात उत्साहाचें आणि आनंदाचें वातावरण आहे. सर्वच राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार, खेळाडूंनी सैन्य आणि पंतप्रधानांचे कौतुक करत आभार मानले आहेत. या कारवाईनंतर पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीनेही प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्ध युद्ध पुकारु नये, असे ट्वीट शाहिद आफ्रिदीने केले आहे.
तो लिहितो की, पाकिस्तान हा शांतताप्रिय देश आहे. ज्या गोष्टी चर्चेमुळे सुटू शकतात, त्यासाठी एवढे मोठे पाऊल उचलण्याची गरज काय? पाकिस्तानला सगळ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. जेव्हा दोन शेजारी देश भांडतात, तेव्हा दोन्ही देशांचे नुकसान होते असे ट्वीट आफ्रिदीने केले आहेे.