Breaking News

निलंग्याच्या पोलिस निरीक्षकांची उचलबांगडी

लातूर, दि. 30 -  निलंगा तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले अवैध धंदे पाहता तेथील पोलिस निरीक्षकांची उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान, तेथे लातूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कल्याण सुपेकर यांची बदली करण्यात आली आहे. 
पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यास सुरवात केली आहे. एका पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुसर्‍या अधिकार्‍यांकडून छापे टाकायला लावण्याची पद्धत त्यांनी अवलंबली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे. शहरात तर गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत मटका गुरुजी‘ला हद्दपार करण्याची कारवाई डॉ. राठोड यांनी केली. आतापर्यंत कोणत्याही अधीक्षकांनी अशी कारवाई केली नव्हती. गुरुजी‘ हद्दपार झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेकांची लक्ष्मी‘ची आवकही थांबली होती.