अंकोटा येथील शेतकर्यांना मदत मिळवून देणार : आ. पंडित
बीड, दि. 30 - अंकोटा ता. गेवराई येथील कोल्हापुरी बंधार्याच्या बाजूने सिंदफणा नदीचा प्रवाह बदलल्यामुळे परिसरातील शेतजमीन वाहून गेली. त्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आमदार अमरसिंह पंडित यांनी मंगळवारी ता.27 नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची ग्वाही या वेळी त्यांनी दिली.
अंकोटा ता.गेवराई येथील कोल्हापुरी बंधार्याचे दरवाजे काही शेतकर्यांनी बंद करून पाणी अडविले होते; मात्र यानंतर गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंदफणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीपात्रात पाणी मावेनासे झाले. त्यात बंधार्याचे दरवाजे बंद असल्याने नदीपात्राने बंधार्यालगतची जमीन खरडून वाहून गेली. परिणामी आजघडीला अक्षरशः नदीपात्राचा प्रवाह बदलला असून बंधार्यालगतच्या शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे येथील शेतकरी सुरेश परदेशी, नामदेव तुपे, चंपाबाई काळे, जिजाबाई बहीर, ऍड. महादेव तुपे यांची शेतजमीन खरडून वाहून गेली आहे.