Breaking News

चिखली शहर कॉगे्रसचा भारतीय लष्काराच्या अभिनंदासाठी जल्लोष

चिखली (प्रतिनिधी), दि. 30 -  भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून हल्ला चढवला, व दहशतवाद्यांच्या तळावर हल्हा करून अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय लष्काराने हिमंत दाखवुुन मोठया धैर्याने अतिरेक्यांचा खात्मा केला अशी माहिती आज कळताच, चिखली कॉगे्रसच्या वतीने भारतीय लष्कराचे आणी सर्जिकल ऑपरेशन करणार्‍या सर्व जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व त्यांचा गौरव करण्यासाठी जनसेवा कार्यालया समोर फाटाक्यांंची अतिशबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. 
काश्मिर मध्ये उरी सेक्टरमधील लष्करी छावणीवर पाकीस्तातून घुसखोरी करून आलेले जैश ए मोहमंद या संघटनेच्या अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यात भारतीय लष्कराचे 20 जवान मुत्यूमुखी पडले होते. उरी हल्यानंतर आज भारतीय जवानांनी पाकव्यांप्त काश्मिरमध्ये घुसून हल्ला चढवला. पाकीस्तानच्या दुटप्पी धोरणाला असेच सडेतोर उत्तर देण्याची गरज आहे.  भारतीय सैन्याच्या या ठोस कामगिरीचा प्रत्येक भारतीय नागरीकाला अभिमान आहे अशा भावना कॉगे्रस कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. याप्रसंगी काँग्रेसच विविध पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.