Breaking News

दोन अल्पवयीन तरुणींवर सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली, दि. 16 -  राजधानी दिल्लीमधील महिलांच्या सुरक्षेवरील प्रश्‍नचिन्ह अजूनही कायम असल्याचं दिसत आहे. दोन अल्पवयीन तरुणींवर त्यांच्याच मित्रांसमोर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणी आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी रात्री 8.30 वाजता बाहेर पडल्या होत्या. मेट्रो स्टेशनजवळ पोहोचले असता त्यांच्यावर चौघांनी हल्ला केला. मुलांना मारहाण करण्यात आली आणि त्यांच्यासमोरच तरुणींवर बलात्कार करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपींनी पीडितांना पोलिसांकडे न जाण्याची धमकीही दिली होती. वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.