Breaking News

अधिक्षक अभियंता हांडे यांना मुख्यमंत्री कार्यालयातून संरक्षण

सार्वजनिक बांधकाम :  तक्रारदार ‘सिंधू’ची प्रतिक्षा; तळीरामाला वेसण घालण्याची अपेक्षा

मुंबई, विशेष/प्रतिनिधी, दि. 3 - लातूरपासून मुंबई शहर इलाखापर्यंत, सोलापूर पासून नाशिक साबां मंडळापर्यंत उच्छाद मांडणार्‍या अधिक्षक अभियंता रणजीत हांडे नामक ‘तळीरामाला’ वेसण घालण्यासाठी प्रशासनातील उच्च पदस्थ लॉबी सरसावली असून या लॉबीचे नेतृत्व भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी करीत असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.
एकच प्याला नावाचे नाटक ज्यांनी पाहिले किंवा वाचले त्यांना सिंधू आणि तळीरामांचे पात्र चांगलेच आठवत असेल. नाटकात लेखकाने मोेठ्या कल्पकतेने हे काल्पनिक पात्र उभे केले. नाटकातील हेच काल्पनिक पात्र सार्वजनिक बांधकाम विभागात प्रत्यक्ष वावरत असून साबांच्या तळीरामाने साबांतील अनेक सिंधूंना त्रस्त केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.नाशिक साबांमंडळाचे अधिक्षक अभियंता रणजीत हांडे यांच्याविषयी साबांवर्तुळात वेगवेगळी प्रकारची चर्चा सुरू आहे. रणजीत हांडे हे सतत तणावाखाली काम करतात. तणावाचे नक्की कारण काय याविषयी स्पष्टपणे उलगडा होत नसला तरी अनामिक ताण दुर करण्यासाठी कुठल्या तरी नशेचा आधार घेणे त्यांना क्रमप्राप्त ठरते असे त्यांच्यानिकटवर्ती यांचे म्हणणे आहे.एका गोष्टीत सांगीतल्याप्रमाणे, नवर्‍या मुलाला सुपारीच्या खांडाचे व्यसन नाही, पण जुगारात हरला तर तो दारूच्या गुत्त्यावर जातो, दारूने धुंद झाल्यानंतर घराची वाट चुकलेल्या नवरा मुलाची पाऊले हळू हळू ‘रमा’लयाकडे वळू लागतात बस्स एव्हढेच! सुपारीच्या खांडाचे व्यसन नाही मुलाला...
तर असे हे तळीराम समाजात चौफेर पहायला मिळतात. प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक स्तरावर वावरणार्‍या या तळीरामाचा वावर साबांतही आहे. नाशिक साबांमंडळाच्या अधिक्षक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या रणजीत हांडे या तळीरामाच्या कर्तृत्वाला साबांतील सहकारी, कंत्राटदार, वरिष्ठ-कनिष्ठ अभियंता इतकेच नाही तर नाशिक भेटीवर येणारे आयएएस अधिकारीही जाम वैतागले आहेत. नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात मुक्कामी असलेल्या एका आयएएस अधिकार्‍यालाही या तळीरामाची अनुभूती आली आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकार्‍याने तक्रारही केली आहे. तथापि मुख्यमंत्री कार्यालयात प्रस्थ बनविलेल्या काही समवर्तनी तळीरामांच्या संरक्षणामुळे नाशिक साबांचा हा तळीराम सुरक्षित असल्याची चर्चा आहे. आता प्रश्‍न फक्त एव्हढाच आहे, साबांची कोण सिंधू तक्रार करायला धजावते आणि त्यानंतर तरी सिंधूला न्याय देऊन या तळीरामाच्या नाकात वेसण घातली जाणार का?