Breaking News

जेएनयुतील विद्यार्थ्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक



नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील ’पीएचडी’च्या विद्यार्थ्याला बलात्काराच्या आरोपीखाली अटक करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. लग्नाचे आमिष  दाखवून या विद्यार्थ्याने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार पीडित विद्यार्थीनीने केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.जेएनयुमधील ब्रह्मपुत्रा वसतिगृहात वास्तव्यास असणा-या अजय सिंग या विद्यार्थ्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. अजय आपल्या बरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये  रहात होता. 2010 पासून लग्नाचे आमिष  दाखवीत होता, असा आरोप पीडित विद्यार्थीनीने केला आहे. मात्र  अजयने हा आरोप फेटाळला आहे.