Breaking News

कालिका यात्रोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल

नाशिक, दि. 30 -  येत्या शनिवार ता. 1 पासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील कालिका मंदिरात यात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक 1 ते 11 ऑक्टोबरदरम्यान अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. दुपारी बारा ते तीन या वेळेतच या मार्गावरून वाहतूक होऊ शकेल. त्याचप्रमाणे भगूर येथील वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे. बदललेल्या मार्गांवरून वाहतूक करावी, असे आवाहन वाहतूक पोलिस शाखेने केले आहे.
कालिका माता यात्रोत्सवामुळे गडकरी सिग्नल ते महामार्ग बसस्थानकापर्यंतच्या मार्गावर यात्रोत्सवानिमित्त दुकाने थाटली जातात. मोठ्या संख्येने भाविकही सहभागी होतात. त्यामुळे या मार्गावर वाहनांसाठी ये-जा कठीण होते. यासाठी या मार्गावरील वाहतूक 1 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत बंद असेल.