सातारा, दि. 16 - पुणे- बंगळुरु महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातात पोलीस हवालदार नितिन जमदाडे (35 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. लक्झरी बसने उडविल्याने त्यांचा मृत्यू झाला. जमदाडे कामावरून मध्यरात्री त्यांच्या घरी परतत होते. तेव्हा रायगाव फाटा येथे अपघात झाल्याचे पाहून ते थांबले. कंटेनर आणि कारमध्ये झालेल्या अपघातातील वाहने बाजूला काढत वाहतूक पूर्ववत करत होते. यावेळी पुण्याकडे निघालेल्या लक्झरी बसने त्यांना ठोकर दिली. या विचित्र अपघातात जमदाडे यांचा मृत्यू झाला. तर वाहतूक पोलीस हवालदार अमोल कांबळे आणि एक होमगार्ड जखमी झाले.