नादिया मुराद संयुक्त राष्ट्र संघाची नवी सदिच्छादूत
नवी दिल्ली, दि. 16 - इसिसमधून स्वत:ची सुटका केलेली नादिया मुराद ही यजिदी महिला संयुक्त राष्ट्र संघाची नवी सदिच्छादूत आहे. नादिया हिला इसिस या दहशतवादी संघटनेमध्ये महिला गुलाम म्हणून बंदी करण्यात आले होते. नादिया आमच्यासह मानवी तस्करीविरुद्ध लढा देईल आणि यासंबंधी जनजागृतीही करेल, असे संयुक्त राष्ट्राकडून सांगण्यात आले आहे.
गेल्या वर्षी नादियाने इसिसमधून स्वत:ची सुटका केली होती. त्यानंतर तिने इसिसमध्ये झालेल्या अन्यायाबद्दल लंडनमधील ट्रेड यूनियन काँग्रेस हाऊसमध्ये सांगितले. इसिसमध्ये महिलांबरोबरच लहान मुलींवरही अत्याचार करण्यात येत असल्याचेही नादियाने सांगितले.