Breaking News

काळाने केलेले एक क्रूर व्यंग्य!

कार्टून पासून सुरु झालेली संघटना कार्टूनमुळेच संपणार...!!

दि. 30, सप्टेंबर - महाराष्ट्रातील मराठी मनाचा हुंकार म्हणून नावारूपाला आलेली शिवसेना आज तमाम मराठा समाजाच्या मनातून उतरू लागल्याचे दिसते. त्याला सर्वस्वी संजय राऊत नामक तथाकथीत शिवसैनिकच जबाबदार आहे हे समोर येणार्‍या प्रत्येक मुद्द्यावरून स्पष्ट होतांना दिसतय. मराठा समाज व शिवसेना यांचे पाच दशकांचे अतूट शिवबंधन एका झटक्यात तुटू लागल्याचे पाहून सकल शिवसैनिकांचे मसिहा स्व.बाळासाहेब हे देखील पश्‍चातापदग्ध अश्रू ढाळत असतील. कोण कुठला संजय रावूत ... मराठा तरूणाईने सारी तरूणाई बर्बाद करून शिवसेनेला बळ दिले..माता भगिनींच्या पदरालाच हात घालणार्‍या नराधमाचें हात छाटून गंभीर गुन्हे अंगावर घेतले. त्याच मराठा समाजाच्या मोर्चाला टार्गेट करून संजय राऊत कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी पार पाडणार्‍या दै.सामनात प्रसिद्ध झालेल्या व्यंग चित्रातून मराठा. माय बहीनींचीच ईज्जत चव्हाट्यावर मांडली. त्याचा प्रचंड संताप मराठा समाजाच्या मनात धुमसतोय. हाच संताप शिवसेनेला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही हीच प्रत्येक मराठा तरूणाच्या मनात भावना दिसते.

प्रत्येक मराठा तरूण म्हणतोय.......

खर तर सुरुवात कशी करावी हे समजत नाही. मी एक सामान्य नागरीक व कट्टर शिवसैनिक..पण आज जे काही झाल त्यानंतर मला ‘स्वत:ला शिवसैनिक म्हणायची सुध्दा लाज वाटते.’ मुठभर मराठ्यांना बरोबर घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना सुरू केली. ज्या ‘मराठ्यांनी शिवसेना लहानाची मोठी करण्यासाठी’ दिवस रात्र एक केला, पोलिसांच्या काठ्या खाल्या. त्या मराठ्यांसाठी आज आपण काय करतोय? आज सकल मराठा एक होतोय त्याच कौतुक करायच सोडून आपण राजकरणात रमताय. साहेब, मला आपल्याला काही प्रश्‍न विचारायचेत, आशा आहे आपण त्यांची उत्तर द्याल..
* ह्या अगोदरच्या सरकारने काय केले ह्याच्याशी आपल्याला काही देण-घेण नाही, पण ज्या मराठ्यांच्या जिवावर आपण राजकारण करतोय त्यांना आपण आरक्षण देऊ शकतो का?
* आरक्षणावर चर्चा करण्यासाठी वेगळं अधिवेशन बोलवा हे पत्रकारांना/जनतेला सांगण्याऐवजी आपण डायरेक्ट मुख्यमत्र्यांना सांगु नाही शकत का? कारण आपण सरकारमध्ये आहोत. * भाजपा जर आरक्षण द्यायला तयार नसेल तर आपले मंत्री/आमदार मराठ्यांसाठी पदाचे राजीनामे नाही देऊ शकत का? * बाळासाहेब गेल्यानंतर पुन्हा सत्ता आपल्याकडे आली पण प्रत्येक वेळी काही सांगायच असेल तर *आज साहेब असते तर साहेबांनी अस केल असत, आज साहेब असते तर साहेबांनी तस केल असत अश्या साहेबांच्या व शिवाजी महाराजांच्या नावाच्या कुबड्या आपण किती दिवस वापरणार? आपल स्वत:च काही कतृत्व आहे कि नाही?
* सत्तेसाठी आपण इतके लाचार झालो आहोत का की भाजपा सारखा पक्ष आपल्याला कुत्रा म्हणतो आणी आपण काहिच करत नाही? का? फक्त सत्तेसाठी? सत्तापिपासु पणा केव्हापासून आला तुमच्यात !
* निवडणुका आल्या कि दरवेळी आपल्याला उमेदवार आयात का करावे लागतात? खर्‍या शिवसैनिकांना संधी का मिळत नाही?
* काँग्रेस-राष्ट्रवादीच्या घराणेशाहीला आपण नेहमी नावे ठेवत आलात मग आदित्य साहेबांना राजकारणात आणून आपण काय साध्य करु इच्छिता? आपल्या बुडाखाली पण अंधार आहेच साहेब. * आपल्याच आमदार-खासदारांना आपल्याला भेटायचे असल्यास अगोदर परवानगी घ्यावी लागते, मग आमच्या सारख्या शिवसैनिकांनी आपल्याला कधी व कस भेटायच?
* ज्या मुस्लिम बांधवांबद्दल आपण नेहमी आमच्या मनात विष पेरत आलात काल तेच मुस्लिम बांधव मराठा मोर्चामध्ये सर्वांना पाणी वाटून सेवा करताना दिसले.. मग आजच्या ह्या हिंदु-मुस्लिम असणार्‍या कडवट व वाईट वातावरणाबद्दल आपण कोणाला दोष देणार? साहेब, मी एक साधा शिवसैनिक..बरेच दिवस झाले हे प्रश्‍न पडले होते पण कसे विचारावे हे समजत नव्हत.. पण आज तुम्हिच ही वेळ आणलीत व लिहायला बसलो..
साहेब, काल मी मराठा मोर्चा मध्ये आई, वडिल व बहिणी बरोबर सामिल झालो होतो.. जातीसाठी.. समाजासाठी.. खुप छाती भरून आली सर्व माता-भगिणींना मोर्चामध्ये पाहून.. अभिमान वाटत होता मराठा असल्याचा.. पण सामना पेपरमध्ये जे मूक मोर्चा बद्दल पाहिल व वाचल तेव्हा तळ पायाची आग मस्तकात गेली * व हे पत्र लिहायला बसलो. * आमच्या माता-बहिनींची इज्जत रस्त्यावर नाही आली साहेब.. एवढा वाईट अपमान व नालायकपणा मी एक मराठा म्हणून कधीच सहन करु शकत नाही. ज्या मराठ्यांनी आपल्याला एवढ काही दिले त्यांचे आपण असे परतफेड करता? खुप झाल आता.. आता सहन नाही करणार.. कारण मी पण जातीनं मराठा आहे.. * साहेब, तुमची पण काही चुक नाहीये ओ कारण तुम्ही तरी कुठ मराठा आहात ना...तुम्हाला काय फरक पडतो हो! तुम्ही फक्त, माझ्या तमाम मराठी बांधवांनो म्हंटल की आम्ही पार बावरुन जायचो पण आता अस नाही व्हायच साहेब... *आजपासून जो पुढारी मराठ्यांच्या बरोबर असेल तोच आमचा नेता असेल....
हाच वणवा शिवसेनेला बेचीराख करण्यास कारणीभूत ठरला तर नवल नाही.