कबड्डी विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर, भारताची सलामीला द. कोरियाशी लढत
मुंबई, दि. 16 - कबड्डी विश्वचषकात यजमान भारतासमोर सलामीच्या सामन्यात दक्षिण कोरियाचं आव्हान असेल. अहमदाबादमध्ये 7 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत कबड्डीच्या विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं असून, या विश्वचषकाचं वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आलं.
कबड्डी विश्वचषकात एकूण बारा संघ सहभागी झाले असून, त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. ग्रुप एमध्ये भारतासह, बांगलादेश, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अर्जेन्टिनाचा समावेश आहे. तर ग्रुप बीमध्ये इराण, थायलंड, जपान, अमेरिका, पोलंड आणि केनियाचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या हस्ते कबड्डी विश्वचषकाच्या लोगोचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. या विश्वचषक भारतानं पटकावावा अशीच आशा चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.