14 वी राज्यस्तरीय सिताफळ उत्पादक कार्यशाळा शेगांवात
मेहकर (प्रतिनिधी), दि. 30 - 2 ऑक्टोबर 2016 रोजी महात्मा गांधी व जय जवान जय किसान चे जनक स्व.लालबहादुर शास्त्री यांचे जयंती दिनाचे औचित्य साधुन संत नगरी शेगावमध्ये 14 व्या राज्यस्तरीय सिताफळ उत्पादक कार्यशाळा व फळांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन ना.भाऊसाहेब फुंडकर कृषी व फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र शासन यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी खा.प्रतापराव जाधव हे राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून संजय धोत्रे खासदार अकोला व कृषी आयुक्त विकास देशमुख यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी प्रा.बी.डी.शेळके, प्रा.डॉ.प्रदिप बोरकर कृषी विद्यापीठ अकोला, प्रा.डॉ.दत्तप्रसाद बासकर, कृषी विद्यापीठ परभणी, प्रा.डॉ.लोहाटे, कृषी विद्यापीठ राहुरी, डॉ.डि.एल कुळकर्णी, जैन फार्म कंपनी जळगांव, प्रा.शिवाजी सरवदे सिताफळ संशोधन केंद्र अंबाजोगाई व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
सिताफळ प्रक्रिया व विक्री व्यवस्थापनासाठी समुह लागवड हा कार्यशाळेचा प्रमुख विषय राहणार असू फळांचे व प्रक्रीयायुक्त पदार्थांच्या प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम संत गजानन महाराज अभियांत्रीकी महाविद्यालय खामगांव रोड शेगांव येथे सकाळी 10 वा.होणार असून नोंदणी शुल्क 100 रुपये ठेवण्यात आले आहे. राज्यातील विविध भागातुन 1000 चे वर शेतकरी या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात 65000 हेक्टरच्या वर सिताफळाची लागवड झाली असून त्यात वेगाने वाढ होत आहे. सिताफळ लागवड, जोपासना, गुणवत्तापुर्ण उत्पादन, विक्री व्यवस्थापन व फळांची प्रक्रीया यासाठी सिताफळ महासंघ पुणे कार्यरत असून या कार्यशाळेसाठी कृषी विभाग महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान पुणे, कृषी विद्यापीठ अकेाला, परभणी व राहूरी यांचे सहकार्य प्राप्त झाले आहे..