गुळूंब-चांदक ओढा जोड प्रकल्प लोकचळवळीचे यश : मुद्गल
सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गुळूंब-चांदक ओढा जोड प्रकल्प आज पूर्ण क्षमतेने यशस्वी ठरला. लोकांनी उभ्या केलेल्या चळवळीचे यश आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी काढले.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या गुळूंब-चांदक ओढा जोड प्रकल्प पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. याच्या पाण्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी पूजन केले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी विजय माईनकर, तहसीलदार अतूल म्हेत्रे, पंचायत समितीच्या सभापती उमाताई बुलुंगे, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार, गटविकास अधिकारी दिपा बापट, चांदक गावचे सरपंच नितीन पाटील, उपसरपंच मधुकर खामकर, गुळूंबचे उपसरपंच कृष्णात यादव, उपअभियंता राजकुमार साठे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुद्गल पुढे म्हणाले, राज्य शासनाने सर्वांसाठी पाणी या उद्देशाने जलयुक्त शिवार अभियान सुरु केले. हे अभियान राज्यात यशस्वी ठरले आहे. याच अभियानांतर्गत वाईमधील गुळुंब-चांदक ओढा प्रकल्प पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे, ही आनंदाची बाब आहे. या प्रकल्पासाठी आमदार मकरंद पाटील, किसन वीर सहकारी साखर कारखाना, मॅप्रो, अथर्व फौंड्री तसेच ग्रामस्थांनी दिलेला निधी अत्यंत महत्वाचा आहे. ज्या पाईपलाईनद्वारे प्रकल्प जोडण्यात आला. ती पाईप 5 फूट पाण्यात आहे. हे या प्रकल्पाचे यश म्हणावे लागेल. लोक एकत्र आले तर काय क्रांती घडू शकतो हा प्रकल्प याचे उत्तम उदाहरण आहे. ही एकी, हा निर्धार यापुढे ग्रामस्थांनी कायम ठेवावा, असे आवाहन मुद्गल यांनी केले.
याप्रसंगी गुळूंब-चांदक ओढा प्रकल्पासाठी निधी देणार्या मॅप्रोचे ऋषीकेश मापारी, किसन वीर साखर कारखान्याचे संचालक रतन शिंदे, सयाजीराव पिसाळ, मधुकर शिंदे, अरविंद कोरडे, ज्ञानदिप सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय पवार, उपाध्यक्ष गजानन धुमाळ, अथर्व फौंड्रीचे गुलाबराव पाटील, पत्रकार भद्रेश भाटे यांचा तसेच गावासाठी दोन गुंट्टे जमीन दिल्याबद्दल विठ्ठलराव यादव यांचा 60 फूट विहीर गावाला उपलब्ध करुन देणार्या किसन माने यांचा जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
विकासाच्या मुद्द्यावर ग्रामस्थांच्या एकीचे दर्शन घडले. त्यामुळेच हा प्रकल्प रोल मॉडेल ठरला. सरकारी अधिकार्यांकडून कार्यत्परता दिसून आली. तसेच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, तत्कालीन प्रांताधिकारी रविंद्र खेबुडकर, तत्कालीन तहसीलदार सदाशिव पडदुने यांचा त्यांनी विशेष काम केले असल्याचे माजी सरपंच अल्पना यादव यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.