महाबळेश्वर तालुक्यातील माचुतरजवळ दरड कोसळली
महाबळेश्वर, दि. 24 (प्रतिनिधी) : महाबळेश्वर येथून 8 कि. मी. अंतरावर डोंगरात व तीव्र उतारावर वसलेल्या माचुतर या गावाजवळ सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून रस्ता पूर्ण बंद झाला.
महाबळेश्वर तालुक्यात धुवाँधार पाऊस पडल्याने अनेक रस्त्यावर दरडी कोसळल्या. पाऊस थांबल्यानंतर 15 दिवसांनी माचुतर गावाकडे जाणार्या रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला. महाबळेश्वर केळघर मार्गावर माचुतर हे गाव आहे. माचूतर हे गाव दोन विभागात वसले असून काही घरे रस्त्यालगत वरच्या भागात आहेत तर मुळ गाव तेथून डोंगराच्या तीव्र उतारावर वसले आहे. याच ठिकाणी गावचे ग्रामदैवत असून यात्रेसाठी सर्व गाव याच ठिकाणी एकत्र येते. डोंगर उतारावर वसलेले गाव दरडीपासून सुरक्षित असले तरी गावातील काही घरे दरडीच्या जवळपास येतात. मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्यास गावातील काही घरे माळीण गावाप्रमाणे गाडली जाण्याचा धोका आहे. दरड कोसळल्यानंतर दगड रस्त्यावर आल्याने रस्ता बंद झाला.