चार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
लातूर, दि. 24 - एका 27 वर्षीय तरुणाने मित्राच्या 4 वर्षीय चिमुरडीवर महादेवनगर येथील राहत्या घरी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
सी. आर. पी. एफ. केंद्रात आरोपी साफसफाई व मजुरीचे काम करत होता. अमृतसर जिल्ह्यातील काले घनूपूर येथील सरवन दल्वीन्दर सिंग असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीला त्रास होऊलागल्यानंतर सदर प्रकार पिडितेने आपल्या आईला सांगितला ज्यावरून आरोपी सरवन दल्वीन्दर सिंग ला एम. आय. डी. सी. पोलिसांनी रात्री ताब्यात घेऊन त्याच्यावर कलम 376 व बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.