Breaking News

महाविद्यालयीन तरुण बेपत्ता, पालकांचा पोलिसांवर आरोप

लातूर, दि. 24 - जिल्ह्यातील चाकुर येथील रहिवासी आसणारा विजयानंद बडि्गरे (20) हा महाविद्यालयीन तरुण 1 ऑगस्ट रोजी कॉलेजला गेला मात्र परत आला नाही. त्यामुळे पालक गणपत बडि्गरे यांनी चाकुर पोलिसात 3 ऑगस्टला तक्रार दिल्यावरून विजयानंद बडि्गरे बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला.
20 दिवस उलटूनही सदर तरूणाचा शोध लागला नसल्याने यावर सबंधित तरुणाच्या पालकांनी आपल्या मुलाचे अपहरण झाले असून चाकुर पोलीस तपास करीत नसल्याचा आरोप केला आहे. दरम्यान चाकुर पोलिसांना संपर्क साधला आसता तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.