मृतावस्थेत सापडलेल्या ’त्या’ तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न
जळगाव, दि. 24 - मेहरुण तलावात मृतावस्थेत आढळलेल्या दिनेश दशरथ मानकुंबरे (वय 25 रा.शाहू नगर, जळगाव) या तरुणाचा त्याच्या मित्राने गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी महेश ज्ञानेश्वर पवार (रा.भोईटे नगर, जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पैशाच्या देवाण-घेवाणवरुन त्याचा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. तरी आणखी काही वेगळे कारण आहे का?, याचा पोलीस शोध घेत आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी दिनेशचा मृतदेह मेहरुण तलावात तरंगताना आढळून आला होता. घटनास्थळावर कपडे व चप्पल आढळून आली होती.
रक्षाबंधनाच्या पूर्वीच चुलत बहिणीने दिनेशच्या हाताला राखी बांधली होती. तपासाधिकारी सहाय्यक निरीक्षक विजय आढाव यांनी जळगाव, औरंगाबाद व गुजरात येथे अशा प्रकारचा तरुण हरविला आहे का?, याची चौकशी केली. त्याच काळात मृत तरुणाची आई विठाबाई, बहिण संगीता व चुलत भाऊ मनोज यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता एक तरुण मेहरुण तलावात मृतावस्थेत आढळल्याची माहिती त्यांना मिळाली.