पुन्हा एकदा नाशिक-मराठवाडा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता
नाशिक, दि. 24 - भर पावसाळ्यात नाशिकवरुन पुन्हा एकदा पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात यावे, यासाठी औरंगाबादचे राष्ट्रवादी आणि काँगेसचे पक्षाचे आमदार आगही आहेत. तर दुसरीकडे नाशिकच्या नेते यापुढे एक थेंब पाणी सोडणार नाही, या भुमिकेत आहेत. पाणी सोडण्याच्या मुद्द्यावरून मराठवाड्यातील नेत्यांना जशास तस उत्तर दिले जाईल असा धमकी वजा इशाराच यावेळी नाशिकच्या नेत्यांनी दिला आहे.
राज्यात यंदा मान्सुनने जोरदार हजेरी लावली, तरी मराठवाडा आणि नाशिकमधली पाण्याची आग काही केल्या थंड व्हायला तयार नाही. औरंगाबादच्या काँगेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी भर पावसाळ्यात नाशिकमधून पाणी सोडावे ही मागणी केली आहे. यासाठी उपोषणाचं हत्यार उपसण्याची तयारी त्यांनी दाखवली. यावेळी चर्चा करून नाशिकच्या नांदुरमध्यमेश्वर धरणातुन पाणी सोडण्यास सांगु, असे आश्वासन औरंगाबादच्या जिल्हाधिकांनी दिल्याने उपोषण पुढे ढकलण्यात आले आहे.
सध्या जायकवाडी धरणात 65 टक्क्यांच्यावर पाणीसाठी उपल्बध आहे. तसे पाहिले तर 65 टक्क्यांच्यावर पाणीसाठा असेल तर वरच्या धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्याची आवश्यकता नाही, असा महाराष्ट्र जलसंपदा नियमन प्राधिकरणाचा अहवाल आहे. समनिहाय पाणी वाटप हे 15 ऑॅक्टोबरनंतर होतो, परंतु ऐन पावसाळ्यात पाणी सोडण्याचा आगह का? असा प्रश्न नाशिककर उपस्थित करत आहेत. अहवालानुसार नाशिकपेक्षाही जास्त पाणी साठा जायकवाडीमध्ये आहे. त्यामुळे मराठवाड्यातील आमदार पाण्याचे राजकारण करताय का? असाही सुर ऐकायला मिळतो आहे.