Breaking News

सिंडीकेट बँकेच्या अधिर्कायावर गुन्हे दाखल करा !

खातेदार महिलांचे थेट सदर बाजार ठाणेप्रमुखांना निवेदन

जालना, दि. 24 - सिंडीकेट बँक शाखेत व्यवस्थापकासह इतर अधिकारी-कर्मर्चायांनी अरेरावी करून, बँकेच्या ग्राहकांना नाहक त्रास देण्याचा सपाटा लावला आहे, अशी तक्रार काही बँकेच्या महिला खातेदारांनी थेट सदर बाजार ठाणेप्रमुखांना दिले आहे.बँक व्यवस्थापक वळु वारण सुरेश याच्यासह पांडे, काळे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात अशी मागणी केली आहे.
सदर बाजार ठाणेप्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, 3 महिन्यापुर्वी सिंडीकेट बँक जालनाचे व्यवस्थापक यांनी मुद्रा लोनचे फॉर्म देऊन संबंधीत कागदपत्रे मागवून स्वत:चा बॉण्ड सर्व कागदपत्रे जमा करून गावात येवून आमच्या घरासमोर फोटो काढले. तुम्हाला एका महिन्यात 2 लाख रूपयांचे मुद्रा कर्ज देतो असे म्हणून चकरा माराव्या लावल्या. तसेच आमच्यासोबत अरेरावीची भाषा केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.