Breaking News

मारहाणीच्या भितीने मुलाची आत्महत्या

लातूर, दि. 24 - एका शाळकरी मुलाने वडिल मारतील या भितीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील देवकरा येथे घडली़ आहे.
देवकरा येथील सुमित नाथराव उर्फ बालाजी गुट्टे (12) हा विद्यार्थी देवकरा पाटील येथील संत भगवानबाबा विद्यालयात सहावी वर्गात शिकत होता. नाथराव यांना शेती नसून मोलमजुरीवरच कुटुंबाची उपजिविका भागवितात पण त्यांना दारुचे व्यसन जडले असल्याने पत्नीच्या मोल मजुरीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो़. आईने मोलमजूरी करून घरात आणून ठेवलेले रुपये वडील नाथराव हे चोरून घेत असताना सुमितने पाहिले वडिल रागावून मारतील या भितीपोटी तो शनिवारी दुपारपासूनच गायब होता त्याचा शोध घेतला असता मंगळवारी गावच्या शेजारी गावापासून 300 फुट अंतरावर असलेल्या बबन फड यांच्या विहीरीत सुमितचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला या प्रकरणी मुलाचे मामा दत्तात्रय सटवाजी दहिफळे यांच्या फिर्यादीवरून किनगाव पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.