Breaking News

पी.व्ही.सिंधूने स्पेनच्या कॅरोलिना मरिनला टाकले मागे

मुंबई, दि. 24 -  रिओ ऑलिम्पिकमधील अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरिनने जरी भारताच्या पी.व्ही.सिंधूचा पराभव केला असला तरी ट्विटरच्या मैदानावर सिंधूच सरस ठरलीये.
रिओ ऑलिम्पिकमध्ये पराभूत होऊनही सिंधूने अनेकांची मने जिंकली. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकण्याची किमया सिंधूने साधल्यानंतर तिच्या ट्विटरवरील फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झालीये. दुपटीने तिच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या वाढलीये.
सिंधूचे सुरुवातीला 36 हजार फॉलोअर्स होते. ऑलिम्पिक यशानंतर तिच्या फॉलोअर्समध्ये तब्बल सहा पटींनी वाढ झालीये. तिच्या फॉलोअर्सची संख्या दोन लाखाहून अधिक झालीये. तर दुसरीकडे मरिनचे केवळ 1,02,000 इतके फॉलोअर्स आहेत.