पारदर्शक कारभारामुळे सभासदांचे हित : वळसे पाटील
। पतसंस्थेचे काम इतर संस्थांना प्रेरणादायी ः खा.शिवाजीराव अढळराव पाटील
पुणे, दि. 24 - धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे काम कौतुस्कापद आहे. धर्मवीर पतसंस्थेने पारदर्शक कारभार करून सभासदांचे हित जोपासले आहे, असे गौरवोद्गार विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले. मंचर येथील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन अद्ययावत मुख्य कार्यालयाचे उद्घाटन वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पतसंस्थेच्या कामकाजाचा गौरव करून सभासदांच्या उन्नतीसाठी बँका, पतसंस्था असाव्यात, अशी अपेक्षा वळसे पाटील यांनी व्यक्त केली.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, ’पतसंस्थेचे काम प्रेरणादायी आहे. पतसंस्थेच्या केवळ दोन शाखा असताना सुमारे 27 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. यावरूनच सभासदांच्या विश्वासाला संस्था पात्र आहे.’ आमदार शरद सोनवणे, महेश लांडगे यांनी पतसंस्थेने अल्पावधीत घेतलेली गरुडझेप कौतुकास्पद आहे, असे सांगितले. भाजपचे अध्यक्ष जयसिंगराव एरंडे, साईनाथ पतसंस्थेचे संचालक युवराज बाणखेले, माजी सरपंच प्रल्हाद बाणखेले, अश्विनी शेटे, संस्थेचे अध्यक्ष उल्हास लोंढे, उपाध्यक्ष सीताराम लोंढे, संचालक मंगेश बाणखेले, पुरुषोत्तम पटेल, सुदाम बेंडे, दिलीप महाजन, सुनील बाणखेले, मनीष ठक्कर, बाबाजी इंदोरे, अनिता निघोट, संदीप अरगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण चिखले, जनसंपर्क अधिकारी शंकरराव पिंगळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. पतसंस्थेचे अध्यक्ष उल्हास लोंढे यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन गणेश कडलक यांनी केले. आभार मंगेश बाणखेले यांनी मानले.
