हज यात्रेकरुंचा पिंपरीत निरोप समारंभ संपन्न
हज यात्रेकरुंना प्रशिक्षक देवून महापौरांच्या उपस्थितीत निरोप
पुणे, दि. 24 - मुस्लिम धर्मियांच्या पवित्र हज यात्रेस पिंपरी चिंचवड,लोणावळा, जुन्नर, खेड, मंचर, चाकण, खडकी भागांतून जाणा-या भाविकांचा निरोप समारंभ पिंपरी मिलिंदनगर येथील जमाते - लतीफिया मशिदीच्या हॉलमध्ये घेण्यात आला.पिंपरी चिंचवड शहर जुलूस कमिटीच्या वतीने या वर्षी हज यात्रेला जाणा-या यात्रेकरुंचे एक दिवसाचे प्रशिक्षण देवून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी महापौर आझम पानसरे, आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक अरुण टाक, अतुल शितोळे, फझल शेख, माजी नगरसेवक नाना काटे, सनी ओव्हाळ, नौशाद शेख, फारुक इनामदार, जुलूस कमेटीचे अध्यक्ष हबीब शेख उपस्थित होते.
हजयात्रेचे विधीवत सोपस्कार कशा पध्दतीने पार पाडावे याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजनासाठी इदरीस मेमन खालू, हाजी गुलाम रसूल, युसूफ कुरेशी, झिशान सय्यद, फकिरभाई मुलाणी, मुस्ताकभाई शेख यांनी परिश्रम घेतले. पुणो शहर जिल्हा हज कमेटीचे उपाध्यक्ष भाईजान काझी यांनी सूत्रसंचालन केले.
