अमेरिकेत प्राणी,पक्षी व वनस्पतींना माणसाइतकेच महत्व
। जिल्हाधिकारी कवडे यांचे प्रतिपादन । अमेरिकेच्या अभ्यासदौर्यावरून आलेले जिल्हाधिकारी अनिल कवडे यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)। 24 - अमेरिकेत प्राणी, पक्षी व वनस्पतींना माणसाइतकेच महत्व असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिली.
सार्वजनिक क्षेत्रातील अंदाजपत्रक आणि अंमलबजावणी या विषयाशीसंबंधी अमेरिकेतील प्रशिक्षणासाठी केंद्र सरकारतर्फे जिल्हाधिकारी कवडे यांची निवड झाली होती. तीन आठवड्यांचा प्रशिक्षण दौरा पूर्ण करुन कवडे परतल्यानंतर त्यांचा प्रेस क्लबतर्फे सोमवारी सकाळी सत्कार करण्यात आला.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय बोरुडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, गोपीचंद कदम, चंद्रभान पराते, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख तसेच सर्व कार्यालयातील वरीष्ठ कर्मचारी व महिला कर्मचारी उपस्थित होते.
कवडे पुढे म्हणाले, अंदाजपत्रक हा घटक कोणत्याही विकासकामाचे नियोजन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. करवसुलीद्वारे अजिर्त झालेल्या निधीचा योग्य कारणासाठी सुयोग्यपध्दतीने उपयोग याबाबी विकासदरामध्ये महत्त्वाच्या ठरतात. तसेच प्रशासनातील मनुष्यबळाचे सर्मपित काम, नागरिकांचे संस्कार, नीतीमूल्य याबाबींना देखील अनन्यसाधारण महत्त्व असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तर अमेरिकेत असलेल्या नैसर्गिक आपत्तींचा संदर्भ देत कवडे म्हणाले, त्या ठिकाणी असलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन तेथील नागरिकांनी विकासदर कायम राखला आहे. तसेच कॅलिफोर्नियात गेल्या तीन वर्षापासून पाऊस पडलेला नाही, तरीही पाण्याचा दुष्काळ तिथे जाणवत नाही, याचे कारण तेथील नियोजनात आहे. ते नियोजन नागरिकांनी मनापासूनप्राणी, पक्षी, वनस्पतींना देखील महत्त्व अमेरिकेत प्राणी, पक्षी, वनस्पतींना माणसांइतकेच महत्त्व असल्याचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी यावेळी सांगितले. तेथील नागरिकांमध्ये असलेल्या वाचनसंस्कृतीकडे लक्ष वेधतांनाच तेथील उणिवांचाही ऊहापोह केला.
अंगीकारल्याचेही चित्र आहे. केवळ तरुणांची मोठी संख्या असून उपयोगाची नाही तर गुणवत्तापूर्ण, सुसंस्कारीत तरुणांची आवश्यकता आहे. स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, सेवा, सार्वजनिक जीवनातील शिस्त याबाबींचा देखील अंगीकार केल्यास भारत देशाच्या महासत्तेची वाटचाल अधिक सोपी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रेस क्लबतर्फे विठ्ठल लांडगे यांनी प्रास्ताविक केले. मन्सूर शेख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कवडे यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार महेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. विजयसिंह होलम यांनी आभार मानले.