सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्र हागणदारीमुक्त होईल- बबनराव लोणीकर
जालना, दि. 24 - आपले गाव स्वच्छ व सुंदर करुन हागणदारीमुक्त करणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. गाव हागणदारीमुक्त झाले तर राज्य हागणदारीमुक्त होईल. यासाठी सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी एकत्रित येऊन कुटुंबस्तर संवाद अभियानात हिरिरीने सहभाग नोंदवून अधिकाधिक शौचालयांची उभारणी केल्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांना अभिप्रेत असलेला स्वच्छ, सुंदर व हागणदारीमुक्त महाराष्ट्र नक्कीच होईल, असा विश्वास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.
स्वच्छ महाराष्ट्रासाठी 18 लाख गृहभेटी, कुटुंबस्तर संवाद अभियानाचा शुभारंभ श्री.लोणीकर यांनी पाटोदा (बोराडे) ता. मंठा येथे कुटूंबाशी संवाद साधून व घरास स्टीकर चिटकवून केला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री रामप्रसाद बोराडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, संतोष लोखंडे, राहुल लोणीकर, मंठ्याचे नगराध्यक्ष कैलास बोराडे, भाऊसाहेब कदम, शहाजी राक्षे, हरिराम माने, गोपाळ बोराडे, गावच्या सरपंच संगीता चव्हाळ, उपसरपंच पंजाब बोराडे, राजेश मोरे, विष्णुपंत घोडके, दत्ताराव बोराडे, अशोक बोराडे, शाम बोराडे, आसाराम बोराडे, गणेश खवणे, रमेश भापकर, श्री. सरोदे, गणेश चव्हाळ, मंगेश चिवटे, गंगाराम आत्राम, मन्सूर खोरसे आदींची उपस्थिती होती.