रक्तदान व वृक्षारोपण करून ना.फुंडकर यांचा वाढदिवस साजरा
चिखली (प्रतिनिधी), दि. 24 - राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री मा.ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने दि.21 ऑगस्ट रोजी चिखली तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान व वृक्षारोपण अशी राष्ट्रीय उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला.
चिखली तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने देऊळगाव घुबे येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन विधानसभा संपर्क मंञी सुरेशआप्पा खबुतरे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी परिसरातील पिंपळवाडी, कोणड, शेळगाव आटोळ, अमोणा, इसरूळ, मगरूळ या गावातील 20 युवकांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला तसेच या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करतांना चिखली विधानसभा संपर्क मंञी सुरेशआप्पा खबुतरे यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल कार्यकर्त्याचे कौतुक केले. यावेळी चिखली तालुका सरचिटणीस शिवाजीराव कुटे, शहर उपाध्यक्ष प्रल्हाद भालेकर, गावच्या सरपंच सौ.आशाताई नंदकिशोर मिसाळ, नामदेवराव गालट, विलास घुगे, विण्णु ठेकेदार, रंगनाथ वरपे, विलास चवरे, अशोक गालट, प्रमोद मिसाळ, राजेन्द्र घुगे, फकीरा घुगे, दिपक पाटील, सुखदेव महाराज, रंगनाथ गाताडे, अरूण लोखंडे, अनिल पुरी, राजेश शेळके, गजानन गालट, पांडुरंग पांडे, अमोल मिसाळ, यांच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती भाजपा प्रसिद्धी प्रमुख विजय खरे यांनी एका प्रसिद्धी पञकाद्वारे दिली.