Breaking News

भगीरथ जलसंजीवनी च्या कामांतून दुष्काळाच्या झळा कमी होतील ः आ.बोंद्रे

बुलडाणा, दि. 24 - तालुक्यातील बोरगाव वसु येथे कृषी विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेच्या अतंर्गत जुन्या माती तलावाची दुरूस्ती व खोलकरण करण्यात आले आहे. या कामांमुळे तलावात मोठया प्रमाणात पाणी साचले आहे. काल 15 ऑगस्ट स्वातंष्यदिनी आ. राहुल बोंद्रे यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले. यावेळी स्ाुरू असलेल्या जलसंधारणांच्या कामांतून दुष्काळाच्या झळा कमी होती असे प्रतिपादन आमदार राहुल बोंद्रे यांंनी जलपुजन प्रसंगी केले. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. सत्येंद्र भ्ाुसारी, पंचायत समिती सभापती लक्ष्मण आंभोरे, माजी प.स.सभापती सविताताई वाघमारे, बाजार समिती संचालक सिध्दूसिंग इंगळे, रामदास मोरे, सरपंच बोरगाव वसू जयश्री काकडे, सरपंच शेलूद प्रदिप मोरे, सरंपच दिवठाणा सिताराम मोरे, कृषी अधिकारी, मंंडळ अधिकारी सुरडकर, कव्हळे, कृषी सहाययक विजय जोगदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जलपुजन प्रसंगी बोलतांना आ. राहुल बोंद्रे यांनी सांगितले की, राज्यासह जिल्हात दुष्काळामुळे मोठया प्रमाणात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहे. चिखली मतदार संघात जलसंधारणाच्या कामांसाठी जलयुक्त शिवार या योजने अतंर्गत मोठया प्रमाणात निधी आणला व कामे प्रगतीपथावार नेली. यासोबतच भगीरथ जलसंजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातुनही मतदार संघात भरीव अशी जलसंधाणाची कामे झाली आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसण्याला सुरूवात झाली असून, आता फक्त चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. या कामांतून तालुक्यातील दुष्काळाच्या झळा कमी होतील असा विश्‍वास त्यांनी जलपुजन प्रसंगी व्यक्त केला.
यावेळी, निबांजी सवडे, विष्णू इंगळे, पुरूषोत्तम शेळके, विमल गवई, सुभाष झगरे, पंढरी वाघमारे, उपसरपंच रवि सपकाळ, कमळकर रूद्राक्ष, गजानन गवई, विजय सुरडकर, श्रीकृष्ण इंगळे, शामचंद्र घेवंद यांच्यासह सर्व ग्रा.प.सदस्य, पोलिस पाटील विजय रूद्राक्ष यांच्यासह गावक-यांची संख्येने उपस्थिती होती.