सधन कुक्कुट विकास गटास पशुसंवर्धन मंत्री जानकरांची भेट
सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सातारा येथील गोडोली येथील सधन कुक्कुट विकास गटास भेट दिली. आजच्या काळात शेतीला जोडधंद्याची नितांत गरज असून कुक्कुटपालनामुळे शेतकर्यांना आर्थिक आधार मिळत असल्याचे मंत्री जानकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, महाव्हेट संघटनेचे अध्यक्ष डॉ. एम. बी. चव्हाण, व पशुचिकित्सा व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद घोरपडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. लियाकत शेख यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. सहाय्यक पशुधन अधिकारी डॉ. अरुण चव्हाण यांनी प्रस्तावाना तर पशुधन अधिकारी डॉ. वंदना कडुकर यांनी कुक्कुटपालना संदर्भात माहिती दिली.
