Breaking News

जिजामाता बँकेच्या ठेवींसाठी बळीराजा संघटनेचे उपोषण


सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : जिजामाता महिला सहकारी बँकेमध्ये अडकलेल्या शेतकर्‍यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 
संघटनेतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शेतकर्‍यांनी घाम गाळून कमवलेले पैसे जिजामाता महिला सहकारी बँकेत ठेव म्हणून विश्‍वासाने ठेवले होते. परंतू बँकेने ठेवीदारांची फसवणूक करून पैसे बुडविण्याचा प्रयत्न चालविला आहे. बँकेच्या संबंधित संचालक, डीडीआर, बँकेचा लेखापरीक्षकांवर तत्काळ कारवाई करून त्यांची मालमत्ता जप्त करून ठेवीदारांना ठेवी परत द्याव्यात. संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील, तालुकाध्यक्ष साजीद मुल्ला, रमेश गरुड, अभिजित मोहिते, इकबाल मुल्ला, कृष्णचंद्र मोहिते, मयूर भंडारी यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आले.