बळीराजा उद्विग्न : कांद्याला मिळाला फक्त 5 पैसे भाव
नाशिक, दि. 24 - जिल्ह्यातील सायखेडा बाजारात कांद्याला किलोला फक्त 5 पैसे एवढा भाव मिळाला आहे. कांद्याच्या भावात पडझड झाली आणि पिंपळगावच्या सायखेडा उपबाजार समितीत सुधाकर दराडे नावाच्या शेतकर्याला फक्त 5 पैसे किलोचा भाव मिळाला.
हताश झालेल्या दराडेंनी कांदा न विकता परत आणला आणि उद्विग्न होऊन खत म्हणून तो शेतात फेकून दिला. काही दिवसापूर्वीच केंद्र आणि राज्य सरकारने शेतकर्याचा कांदा विकत घेण्याची तयारी केली होती. त्यामुळे शेतकर्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र कष्टाने पिकवलेला, दुष्काळ, संप, आंदोलन, अतिवृष्टीच्या संकटापासून जगवलेला कांदा मातीमोल होताना पाहण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकर्यांवर आली आहे. शेतीमाला मिळणार्या या भावाने उद्विग्न झालेला शेतकरी उद्वस्त होत आहे.