Breaking News

दहीहंडीचे मनोरे 20 फुटापर्यंतच, नियम बदलणार नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली, दि. 24 - दहीहंडीची उंची आणि ठरवून दिलेल्या नियमात बदल करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे दहीहंडीत 18 वर्षांखालील गोविंदांना सहभागी होता येणार नाही, तसंच 20 फुटापेक्षा जास्त उंचीचे मनोरेही उभा करता येणार नाहीत.
दहीहंडीच्या उंचीबाबत मुंबईतील जय जवान गोविंदा पथकाने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान, सुप्रीम कोर्टाने नियमात बदल करण्यास नकार दिला. गेल्या बुधवारी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत, दहिहंडीत 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे गोविंदा नकोत, तसंच 20 फुटांपेक्षा जास्त मानवी मनोरे रचण्यासही निर्बंध लादले होते.