कवलापूर मारामारी ः 27 जणांविरुद्ध गुन्हा
प सांगली, दि. 23 - कवलापूर ता. (मिरज) येथे झालेल्या मारामारीप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन्ही गटातील 27 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच जणांना सकाळी अटक केली. दोन्ही गटाने परस्परांविरुद्ध फिर्याद दाखल केल्याने मध्यरात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. सुनीता राजू मोहिते (वय 38) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, किशोर भोरे, विपुल भोरे, लखन मोहिते, अमोल मोहिते, शुभम मोहिते, आनंद मोहिते, विशाल मोहिते, दिनकर मोहिते, शुभांगी मोहिते, नंदा मोहिते, गौरी मोहिते व कांचन मोहिते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. दुसर्या गटाकडून विशाल शिवलिंग मोहिते (35) याने दिलेल्या फिर्यादीवरुन, विजय मोहिते, चंद्रकांत मोहिते, गणेश मोहिते, राकेश मोहिते, दुल्या मोहिते, उमेश मोहिते, शालन मोहिते, शोभा मोहिते, छाया मोहिते, सुनीता मोहिते, आशा मोहिते, यशवंत मोहिते, मनोज मोहिते, महेश मोहिते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जखमी झालेलेल नऊजण अजूनही सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी संशयितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. विजय शेखर मोहिते (22), चंद्रकांत शेखर मोहिते (20), महेश उर्फ गणेश राजू मोहिते (23), मनोज दिनकर मोहिते (21) व महेश दीपक मोहिते (23) याच पाचजणांना अटक करण्यात आली आहे. अन्य संशयितांचा शोध सुरु आहे.
