Breaking News

राष्ट्रीय क्रीडा धोरणाची गरज !

ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधु, साक्षी मलिकने पदकांचा दुष्काळ संपविला तर दीपा कर्माकरने चांगले प्रदर्शन केले. या मुलींनी जगात भारताचा मान वाढविला. भारतीय समाजातील मुलींबाबतचा पसरलेला भ्रम आणि संकोचपणा दूर केला आहे. मुलींनी हे सिद्ध केले आहे की, जर त्यांना जागतिक स्तराच्या सुविधा मिळाल्या तर त्या भारताचे नाव जगात रोशन करु शकतात. ‘अगले जनम मोहि बिटिया न कीजो’ ही म्हण आता कालबाह्य ठरविली आहे. रियो ऑलिंपिकमध्ये देशाला शिखरावर पोहोचविणार्‍या मुलींचा संपूर्ण देश गौरव करीत आहे. सिंधु आणि साक्षी मलिकने जे आपले प्रदर्शन केले ते इतिहासात नोंदले गेले आहे. संपूर्ण देश या जिगरबाज मुलींना सलाम करीत आहे. पदक तालिकेत भारताचे कुठेच स्थान नव्हते, परंतु सोन्याची किनार जरी रिकामी असली तरी आपण आपली उपस्थिती दाखवून दिली आहे ती याच मुलींच्या बळावर. 1984 मध्ये उडऩपरी नावाने प्रसिद्ध असलेली पीटी उषा लॉस एंजिल्समध्ये आयोजित ऑलिंपिकमध्ये कांस्य पदकापासूनही वंचित राहिली होती. परंतु मुलींना पुढे आणण्यासाठी तिने चांगली भूमिका निभावली. सिंधु आणि साक्षीने आपल्याला चांगले योगदान मिळवून दिले आहे. सोने लुटण्याची गोष्ट दूर जरी राहिली असली तर भारताची उपस्थिती नोंदविणे हेही तितकेच महत्वाचे राहिले. जे काम मुलींनी केले आहे. कारण आपल्याकडे जशा सुविधा असायला हव्यात तशा नाहीत. आपणाला आता राजकारणाची दिशा बदलावी लागेल. आज जो विजय आपल्यासाठी मोठा वाटत आहे आणि त्याला मोठे यश समजून आपण आनंदोत्सव साजरा करीत आहोत. हेच आपले अपयश सिद्ध करीत आहे. या अपयशामागेे आपले सरकारी धोरणे दोषी आहेत. आपण खेळांना चालना देण्यासाठी ठोस उपाययोजना आखल्या नाहीत, त्याचा परिणाम म्हणून आपल्याला फक्त रौप्य आणि कांस्य पदकावरच समाधान मानावे लागत आहे. यापेक्षा जास्त अपेक्षा आपण करु शकत नाही. आपल्यासाठी हा गंभीर चिंतेचा विषय आहे. आपण जागतिक खेळाडूंच्या तुलनेत टिकाव धरु शकत नाही. अमेरिका, बिˆटन, रशिया, चीन, जपान, जर्मनी, इटली, फ्रांस, हॉलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया व हंगरीविरुद्ध आपण सामना करु शकत नाही. कारण आपल्याकडे धोरण आणि इच्छाशक्ती दोन्हीही नाही. सरकारच्या धोरणांमध्ये फक्त त्यांची सत्ता आणि त्यांच्या केंद्रियकरणापर्यंतच मर्यादित राहिले आहे. जलतरण, नेमबाजी, शर्यत, भारोत्तोलन, कुस्ती आणि दुसर्‍या खेळांमध्ये आम्ही मागे पडलो. जगातील खेळाडू पदक जिंकत आहेत आणि आपल्या खेळाडूंवर डोपिंगच्या आरोपात बंदी घालण्यात येत आहे. आपल्या देशातील मुली पदकासाठी जमीन आणि आसमान एक करीत आहेत तर पुरुष रियो नकाशावरुन गायब आहेत. असे का होत आहे. याला कोण जबाबदार आहे. याचा आम्ही कधी गांभीर्याने विचार केला नाही. आम्ही ऑलिंपिकसाठी खेळाडूंना कधी तयार केले नाही. विजय मिळवून आल्यानंतर त्यांच्यावर पैसा आणि सुविधांचा खूप वर्षाव करण्यात आला. परंतु याच्याही पुढे आणखी जमीन आहे यावर आम्ही विचार केलेला नाही. जर याच सुविधा खेळाडूंच्या तयारीवर खर्च केला गेला तर आणि जागतिक स्तरावरील खेळाच्या सुविधा, चांगले प्रशिक्षक, स्टेडीयम आणि कोर्ट उपलब्ध करुन दिले गेले तर भारत पदक तालिकेतून गायब होईल काय? आज मलिक आणि सिंधु यांच्यासाठी राज्य सरकारे आणि बॅडमिंटन फेडरेशनकडून ज्याप्रकारे भेटींचा, सुविधांचा वर्षाव केला जात आहे हे आधीच केले असते तर ही स्थिती आणखीनच सुखद असती आणि निकालही चांगले लागले असते. निश्‍चितच आपल्यासाठी ही आनंद साजरा करण्याची संधी आहे परंतु यापेक्षाही अधिक आपले अपयश लपविण्याचा आनंद आहे. आर्थिक विषमतेचा सामना करीत असलेल्या खेळाडूंना जर त्या स्तराच्या सुविधा आणि खर्च उपलब्ध करुन दिला तर जगभरातील देश पदक तालिकेत भारताचा सामना करु शकणार नाहीत. परंतु आपले सरकार आणि क्रीडा संस्थांची झोप कधी उडेल हे सांगणे अवघड आहे. खेळावरील राजकारण बंद व्हावे. जोपर्यंत सरकार खेळाबाबत जागृत होणार नाही तोपर्यंत आपली स्थिती प्रतिकूल राहील. व्यक्तिगत स्पर्धांमध्ये साक्षी मलिक, पीव्ही सिंधु आणि दीपा कर्माकर यांनी जे प्रदर्शन केले आहे, त्यामध्ये सरकारचे मोठे योगदान नाही. कारण पीव्ही सिंधु सारखी खेळाडू आपली मेहनत आणि कुटुंबियांच्या सहकार्याने या ध्येयापर्यंत पोहोचली आहे. या विजयामागे सिंधुचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचे योगदान राहिले आहे. सिंधुला या ध्येयापर्यंत पोहोचविण्यासाठी गोपीचंद यांनी स्वत:ला एका प्रशिक्षकाच्या भूमिकेपर्यंतच मर्यादित ठेवले नाही. सिंधुसाठी डायटीशियन, डॉक्टर आणि एका पालकाची भूमिका निभावली, त्याचेच फळ आज दिसून येत आहे. जर पुलेला सारखे द्रोणाचार्य देशात निर्माण झाले तर भारताला सोने लुटण्याच्या शर्यतीतून जगातील कोणतीही शक्ती दुर्लक्षित करु शकत नाही. सलग 12 वर्षांच्या कठोर मेहनतीच्या बळावर सिंधुला हे ध्येय गाठता आले आहे. रियोमधील ऑलिंपिक स्पर्धाही संपत आली आहे. या 16 वर्षांच्या काळात आपण कधीच याकडे लक्ष दिले नाही. हीच आपल्यातील सर्वात मोठी उणीव आहे. आपण भावनेचा अधिक तर मनाचा आणि बुद्धीचा वापर कमी करतो. आम्ही पुन्हा राज्यवर्धन सिंह राठौर आणि अभिनव बिंद्रा निर्माण करु शकलो नाही. या विजयाच्या धुंदीत आम्ही सर्व विसरुन गेलो. मुली पुढे जात आहेत परंतु आपल्या क्रीडा धोरणात बदल करण्याची गरज आहे. रियो ऑलिंपिकमधून आपणाला शिकण्याची आणि संशोधन करण्याची गरज आहे. सरकारने यात विशेष लक्ष घालणे आवश्यक आहे. आपण कुठे चुकलो, आपल्यात कमतरता जाणवली. यावर विचार करायला हवा. ऑलिंपिकमध्ये भाग घेणार्‍या प्रत्येक खेळाडूचे वैयक्तिक मत घेणे आवश्यक आहे. त्यांच्या मते अपयशाचे कारणे कोणती आहेत. त्यानंतर एक व्यापक राष्ट्रीय क्रीडा धोरण तयार करणे गरजेचे आहे.