Breaking News

अमरनाथ यात्रेला सुरुवात

जम्मू, दि. 02 -  जवळपास 48 दिवस चालणा-या अमरनाथ यात्रेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. या यात्रेवर दहशतवादी कारवायांचे सावट असल्याने परिसरात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांच्या उपस्थितीत 1282 यात्रेकरूंची पहिली बॅच शुक्रवारी अमरनाथच्या दिशेने रवाना झाली. जम्मू शहर परिसरातील भगवती नगर बेस कॅम्प परिसरात सुरक्षेसाठी ड्रोनचा वापर केला जात आहे.
येथील दोन मार्गावर सुमारे 20 हजार जवानांचा ताफा सुरक्षेसाठी सज्ज ठेवण्यात आला आहे. अमरनाथ यात्रा शांततेत पार पडण्यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्री
राजनाथ सिंग यांनी सांगितले.