Breaking News

’इसिस’च्या संशयितांना ’एमआयएम’ करणार मदत

हैदराबाद, दि. 02 -  इस्लामिक स्टेट इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून भारतातून अटक करण्यात आलेल्या युवकांना कायदेशीर लढाई लढण्यासाठी एमआयएम मदत करणार असल्याचे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.
ओवेसी यांनी या युवकांना मदत करण्याचे जाहीर करताना आमच्या पक्षाचे दहशतवादाला समर्थन नसल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने एनआयए आतापर्यंत अनेक जणांना इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी जाण्याच्या व इसिसशी संबंधित असल्याच्या संशयावरून अटक केली आहे. नुकतेच हैदराबादमधून सहा जणांना अटक करण्यात आली होती.
ओवेसी म्हणाले की, माझी अल्लाकडे दुवा आहे त्यांनी इसिसमधील दहशतवाद्यांची मानसिकता नष्ट करावी. अटकेत असलेल्या युवकांच्या कुटुंबीयांशी मी संवाद साधला आहे, ते सर्व निर्दोष आहेत. एका वरिष्ठ वकिलामार्फत आमचा पक्ष या युवकांना कायदेशीर मदत करणार आहे. उद्या हे युवक निर्दोष निघाले, तर यांचे आयुष्य कोण परत आणून देणार आहे. दहशतवादाचे समर्थन आम्ही करतच नाही. भारतावर हल्ला करण्यासाठी कोण आले, तर आम्ही त्यांच्यासमोर उभे राहू.