प्रियंका गांधी करणार उत्तर प्रदेशात प्रचार
लखनौ, दि. 04 - उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रियांका गांधी यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काँग्रेसला अच्छे दिन आणायचे असतील तर प्रियांका गांधी यांनाच मैदानात उतरवा, प्रियांका हा काँग्रेससाठी शेवटचा आशेचा किरण असल्याचे मत काँग्रेसचे निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी मांडले होते. सध्या उत्तर प्रदेशात विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाला असून, विविध पक्षांनी आपले बालेकिल्ले, नेते निश्चित करून ठेवले आहेत. काँग्रेसला मात्र प्रदेश पातळीवर भक्कम नेतृत्व देण्यात अपयश आले आहे. प्रदेश काँग्रेसदेखील सध्या अंधारात चाचपडताना दिसते.
गांधी घराण्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्या अमेठी आणि रायबरेलीवरही प्रशांत किशोर यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रचार प्रियांका गांधी यांनी करायचा की राहुल यापेक्षा प्रशांत किशोर यांना नेमके कोण हवे हे सर्वांत महत्त्वाचे असल्याचे एका काँग्रेस नेत्याने सांगितले. प्रशांत यांनी बूथ कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायला सुरवात केली असून, महत्त्वाच्या नेत्यांशी ते दूरध्वनीवरून संवाद साधत आहेत. अन्य पक्षांनी आपले उमेदवार निश्चित केले असताना काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष मात्र काही केल्या संपायला तयार नाही, यावर अनेक नेत्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
ज्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्याची अधिक शक्यता आहे, अशाच ठिकाणी प्रियांका गांधी यांच्या सभा घेण्याचे नियोजन प्रशांत किशोर यांनी आखले आहे. प्रशांत किशोर यांच्या टीमने असे दीडशे मतदारसंघ निश्चित केले आहेत. पक्षांतर्गत मतभेदांमुळे काँग्रेस पक्षाचेच सर्वाधिक नुकसान होत असल्याचे बोलले जाते.