पुणे जिल्ह्यांतील धरणातील पाणीसाठ्यात वाढ
खडकवासला, दि. 04 - टेमघर, पानशेत, वरसगाव व खडकवासला धरणाच्या पाणलोटात एक जुलैपासून पावसाची संततधार सुरु असल्याने सोमवारी सकाळपर्यंत धरणांत एकूण 3.90 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे, शहरासाठी 100 दिवसांचे पाणी धरणात उपलब्ध आहे.
या चार ही धरणात एक जुलैपासून अडीच टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. चार दिवसांत पुणे शहराला दोन महिने पुरेल एवढे पाणी जमा झाले आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणात 1 जुलै रोजी 1.47 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. तो सोमवारी सकाळी 3.90 टीएमसी पाणी जमा झाले आहे. त्यानुसार धरणाच्या पाणीसाठ्यात 2.53 टीएमसीने वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये खडकवासला येथे 94 मिमी, पानशेतला 120 मिमी, वरसगावला 122 मिमी आणि टेमघर येथे 158 मिमी पाऊस पडला आहे.
वरसगाव धरणात दासवे येथे लवासा कंपनीचे छोटे धरण आहे. त्या धरणात किरकोळ पाणीसाठा शिल्लक होता. वरसगाव येथे धरणावर पडणार्या पावसाच्या तिप्पट पाऊस सकाळी 24 तासात 134 तर सकाळ पासून 74 मिलिमिटर पाऊस पडला. त्यामुळे दासवे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.