माळशेज घाटात पाऊसामुळे दरड कोसळली
पुणे, दि. 04 - नगर-कल्याण मार्गावरील माळशेज घाटात सोमवारी पहाटे दरड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माळशेज घाटात जोरदार पाऊस होत असल्याने दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने मार्ग पूर्णपणे ठप्प झाला असून, दोन्ही
बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरड हटविण्याचे काम प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरु आहे. मात्र, पावसामुळे कामात अडथळे येत आहेत. या मार्गावरील वाहतूक आणखी दोन दिवस ठप्प राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. माळशेज घाटात नेहमीच दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच जोरदार पाऊस झाल्याने पुन्हा ही घटना घडली आहे.