यू मुंबाचा रोमहर्षक विजय तर जयपूराचा बंगलावर विजय
जयपूर, दि, 02 - प्रो कबड्डी लीगमध्य सातव्या दिवशी दोन्ही सामन्यात अटीतटीची कबड्डी कबड्डी प्रेमींना पाहवयास मिळाली. रिशांक देवाडिगाच्या शानदार खेळाच्या बळावर यू मुंबाने प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामातील शुक्रवारच्या लढतीत दबंग दिल्लीवर 27-25 असा रोमहर्षक विजय मिळवला. देवाडिगाने 14 चढायांमध्ये 8 गुणांची कमाई केली. या विजयासह मुंबाने 11 गुणांसह गुणतालिकेत दुसर्या स्थानावर झेप घेतली. दिल्ली चार गुणांसह सातव्या स्थानी कायम आहे.
पहिल्या पाच मिनिटांत दोन्ही संघ 2-2 अशा बरोबरीत असताना अनुप कुमारने 10 व्या मिनिटाला चढाई करत यू मुंबाला 6-5 अशी आघाडी मिळवून दिली. काशिलिंग आडकेने दोन गुणांची कमाई करून यू मुंबावर लोन चढवत दिल्लीला 13-9 असे आघाडीवर आणले. दुसर्या सत्रात सामना 15-15 अशा बरोबरी असताना देवाडिगाने सुपर चढाईत तीन गुणांची कमाई करत सामन्यात चुरस निर्माण केली. अखेरच्या क्षणात देवाडिगा आणि अनुपला दिल्लीच्या काशिलिंग आणि सेल्वामणी के. यांनी तोडीस तोड उत्तर दिले.
दिल्लीकडून कडवा संघर्ष देताना सेल्वामणीने सामना 26-25 असा अटीतटीचा आणला. मात्र अनुपने अखेरच्या चढाईत एक गुण कमवत मुंबाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दुसर्या सामन्यात आपल्या घरच्या मैदानावर जयपूर पिंक पँथरने बंगाल वॉरियर्सला 3 गुणांनी पराभूत करत लीगमध्ये दुसर्या विजयाची नोंद केली. पँथरकडून कणीधार जसवीर सिंग याने सुपर टेनचा पूर्ण केला. जसवीर सिंगने 13 गुणांची कमाई केली. तर त्याला शब्बीर बापू शबूउद्दीन याने चांगली साथ दिली शब्बीरने चढाई तसेच पकडीत चांगली कामगरीत केली. बंगाल वॉरियर्सकडून नितीन मदने, मोनू गायल यांनी चढाईत चांगली कामगिरी केली तर पकडीमध्ये निलेश शिंदे याने चांगली कामगीरी बजावली. सामन्यात दोन्ही संघ एकदा एकदा ऑल आउट झाले सामना कधी बंगालकडे तर कधी जयपूरकडे झुकत होता.